Ad will apear here
Next
वर्ल्ड स्किल स्पर्धेत ‘एमआयटी’च्या दोन विद्यार्थ्यांना पदक
वर्ल्ड स्किल स्पर्धेतील पदक विजेते रोहन हनागी व ओंकार गुरव

पुणे : रशियातील कझान शहरात झालेल्या ४५ व्या वर्ल्ड स्किल स्पर्धेत ‘एमआयटी’च्या रोहन हनागी व ओंकार गुरव या विद्यार्थ्यांनी मोबाइल रोबोटिक्स विभागात मेडल ऑफ एक्सलन्स पटकावले.

भारत सरकारच्या कौशल विकास व प्रशिक्षण मंत्रालयातर्फे देशातील विविध शैक्षणिक संस्थांमधून ४८ विद्यार्थ्यांची निवड या स्पर्धेसाठी करण्यात आली होती. त्यात रोहन आणि ओंकार यांची मोबाइल रोबोटिक्स स्किलसाठी निवड करण्यात आली. दोघे आळंदी येथील एमआयटी महाविद्यालयात इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंगला चौथ्या वर्षात शिकत आहेत. या यशाचे श्रेय त्यांनी आई-वडील व प्रशिक्षक प्रा. श्रीधर खांडेकर यांना दिले.

त्यांना संस्थेचे संचालक महेश गौंडर, डीन देबोशिष अधिकारी व प्रा. वैशाली वांगीकर यांचे मार्गदर्शन लाभले.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/UZPZCE
Similar Posts
जागतिक कौशल्य स्पर्धेत भारतीय संघाला १९ पदके पुणे : रशियामधील कझान येथे पार पडलेल्या जागतिक कौशल्य स्पर्धेत भारतीय संघाने उत्कृष्ट कामगिरी करत १९ पदके पटकावली आहेत. या स्पर्धेत भारताने १३ वे स्थान मिळवले आहे. भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ४८ स्पर्धकांच्या संघाने या स्पर्धेत एक सुवर्ण, एक रौप्य, दोन कांस्य आणि १५ उत्कृष्टता पदके मिळविली.
‘एमआयटी’तर्फे यूपीएससी यशस्वितांचा सत्कार पुणे : एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटतर्फे (मिटसोग) केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (युपीएससी )२०१८ मधील परीक्षेत यशस्वी झालेल्या उमेदवारांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे. शनिवारी, १३ जुलै २०१९ रोजी सकाळी दहा वाजता ‘एमआयटी’च्या स्वामी विवेकानंद सभागृह येथे हा कार्यक्रम होणार आहे
कृष्णधवल निसर्गचित्रांचा किमयागार ‘क्रुकवेल’ हे आगळेवेगळे तंत्र वापरून काळ्या, पांढऱ्या रंगात निसर्गचित्रे साकारणारे पुण्यातील चित्रकार उमाकांत कानडे यांच्या चित्रांची रशियात सध्या सुरू असलेल्या दहाव्या आंतरराष्ट्रीय कलाप्रदर्शनासाठी निवड झाली आहे. ११ एप्रिलला सुरू झालेले हे प्रदर्शन १५ एप्रिलपर्यंत सुरू राहणार असून, पुण्यातून निवड झालेले ते एकमेव कलाकार आहेत
ब्रिजस्टोन इंडियाच्या सहकार्याने हिस्टोपॅथॉलॉजी प्रयोगशाळेची उभारणी आळंदी : ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांना अधिकाधिक गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा मिळावी, या उद्देशाने ब्रिजस्टोन इंडिया, या आघाडीच्या टायर उत्पादक कंपनीने आळंदीजवळ असलेल्या इंद्रायणी हॉस्पिटल अँड कॅन्सर इन्स्टिट्यूटमध्ये हिस्टोपॅथॉलॉजी प्रयोगशाळा उभारण्यास सहकार्य केले आहे. ब्रिजस्टोन इंडियाचे संचालक अजय सेवेकरी,

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language